वात, पित्त व कफ प्रकृतीच्या व्यक्ती ओळखण्याची ७ वैशिष्ठ्ये

7 Characteristics to identify Vata, Pitta, Kafa Nature of Human

प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वात, पित्त व कफ यांनी युक्त असते व मानवी शरीरासाठी गरजेचे असते. संतुलित वात, पित्त व कफ आरोग्यासाठी उत्तम असते. वात, पित्त व कफ संतुलीत ठेवण्यासाठी आहार, व्यायाम व योग्य दिनचर्या असणे गरजेचे असते. योग्य दिनचर्या नसल्यास तीन दोषां पैकी एखादा दोष बाकीच्या दोन दोषांना दाबून स्वताःचे वर्चस्व दाखवतो. वात, पित्त व कफ या प्रत्येकाची वैशिठ्ये वेगवेगळी आहेत. म्हणूनच ज्या दोषाचे वर्चस्व जास्ती त्या दोषाचे विशिष्ठ गुणधर्म त्या व्यक्तींच्या स्वभावातून, वागणुकीतून,  शरीरयष्टीतुन व अनेक गोष्टींतुन आपणास जाणवते. या वात, पित्त व कफ यांच्या वर्चस्वा नुसार प्रत्येक व्यक्तीची जडण घडण, वागणूक, विचार, वेगवेगळे दिसतात. ती वैशिष्ठ्ये आपण जाणून घेतली की ती व्यक्ती वात, पित्त व कफ या पैकी कोणत्या प्रकृतीची आहे ते सहज ओळखता येते.

मानवी शरीर हे पंच तत्वांनी बनलेले असते. जसे पृथ्वी, जल, अग्नी, वायु व आकाश व या तत्वांच्या एकत्रित प्रभावातून वात, पित्त व कफ हे त्रिदोष निर्माण होतात जे आपल्या शरीरास आवश्यक असतात. कोणते तत्व एकत्रित आले कि कोणता दोष निर्माण होतो ते पाहू. 

Img source-Google

वायु + आकाश = वात प्रकृती 
अग्नी + जल  = पित्त प्रकृती 
जल + भूमी = कफ प्रवृत्ती 

वात, पित्त व कफ प्रकृतीची व्यक्ती कशी ओळखावी ?

ढोबळ मानाने बारीक शरीरयष्टी असलेली व्यक्ती वात प्रवृत्तीची, तर मध्यम शरीरयष्टी असलेली व्यक्ती पित्त प्रवृत्तीची व स्थूल शरीरयष्टी असलेली व्याक्ती कफ प्रवृत्तीची असते अस सर्वसाधारणपणे मानले जाते. पण नुसत्या अश्या पद्धतीने काही प्रमाणात अंदाज बरोबर येऊ शकतो. पण बऱ्याच औंशी योग्य उत्तर जाणण्यासाठी वात, पित्त व कफ या प्रकृतीची वैशिष्टये जाणून घेऊया. 

Img source-Google

वात, पित्त व कफ प्रकृतीच्या व्यक्तींची वैशिष्ठ्ये

◉   वात

वात प्रकृतीच्या व्यक्ती बारीक अंगकाठीच्या असतात, भूक कमी लागणे, पचना संबंधी समस्या असते, थंडी सहन होत नाही, लवकर चिडणे, चंचल, निर्णय घेण्यास असक्षम, खूप चुळबुळे / अस्थिर व कमी झोप ह्या वैशिष्ठयांमुळे वात  प्रकृतीच्या वक्ती ओळखायला सोप्या जातात. 

   पित्त 

पित्त प्रकृतीच्या व्यक्ती मध्यम बांध्याच्या असतात, लोकांमध्ये मिसळणारे, पचन शक्ती उत्तम, भूक सहन होत नाही / वरचेवर भूक लागते, नेहमी आनंदी, उष्णता सहन होत नाही व लवकर भडकणारे असतात. ह्या वैशिष्ठयांमुळे पित्त  प्रकृतीच्या वक्ती ओळखायला सोप्या जातात. 

   कफ 

कफ प्रकृतीच्या व्यक्ती स्थूल अंगकाठीच्या असतात, शांत स्वभावाचे, कमी हालचाल, पचनशक्ती कमी असते, गाढ झोपणारे असतात, आत्मसंतुष्ट, ठाम निर्णयाचे असतात. ह्या वैशिष्ठयांमुळे कफ प्रकृतीच्या वक्ती ओळखायला सोप्या जातात. 

वात, पित्त व कफ यांच्या कमी अधिक वर्चस्वा नुसार प्रत्येक व्यक्तीच्या वैशिष्ठयांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.थंड व उष्ण प्रकृती ही वात, पित्त व कफ यांच्या एकत्रीत प्रभावातून ठरत असते

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.