आजच्या आधुनिक काळात पाश्च्यात्य देशातील अनेक गोष्टींचे अंधानुकरण भारतात सुरु आहे. त्यामुळे अनेक भारतीय व्यक्तींना भारतातील परंपरा, सण, सण साजरे करण्या मागील मूळ उद्देश माहीतच नाहीयेत. आपल्या मानसिक व शारीरिक निरोगी जीवनासाठी महत्वाचा असलेला आयुर्वेद याच्या बद्दलची माहिती फार कमी लोकांना आहे. त्यातल्यात्यात जुजबी तसेच आयुर्वेद प्रति आदर तसेच आयुर्वेदानुसार जगण्याची मानसिकता असलेल्या बऱ्याच व्यक्ती भारतात व परदेशातही आहेत. हीच एक जमेची बाजू आहे.
आयुर्वेदा नुसार प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वात, पित्त व कफ या त्रिदोषांनीं युक्त असते. या त्रिदोषांचे संतुलन बिघडल्यास निरनिराळ्या शारीरिक व्याधी सुरु होतात. तसेच शरीरातील विषद्रव्य व अतिरिक्त उष्णतेमुळे सुद्धा विविध व्याधी उद्भवतात. मुळात ह्या त्रिदोषांचे संतुलन का बिघडते? हा महत्वाचा प्रश्न समजून घेऊया. आपण रोज जे अन्न सेवन करतो त्या अन्नाला सुद्धा वात, पित्त व कफ या पैकी एक दोष असतोच. जसे काही पदार्थ वातूळ असतात काही पित्तकर, कफ कारक तर काही उष्ण असतात. आपण हेच अन्न आपल्या प्रकृती नुसार सेवन न करता जिभेला जो पदार्थ आवडेल तसेच पोटात जेवढी जागा आहे तेव्हढे भरपूर प्रमाणात सेवन करतो. असे वारंवार झाल्यामुळे शरीरातील वात, पित्त व कफ यांचे संतुलन बिघडते. पण तरीही आपले शरीर एका विशिष्ट मर्यादे पर्यंत हे असंतुलन सहन करत असते. ही सहन शक्ती जेव्हा संपते तेव्हा आपल्याला त्या त्या आजाराची लक्षणं दिसायला सुरुवात होते. ही सहन शक्ती सर्वसाधारणपणे आपल्या तारुण्यातील कालावधीत जास्त प्रमाणात असते. म्हणूनच तरुण वयात असताना आपण काहीही, कितीही, कधीही अन्न सेवन केले तरी आजाराची लक्षण लगेच दिसत नाहीत. शरीराला आवश्यक असलेले अन्न घटक जसे विविध प्रकारची जीवनसत्व, खनिज, क्षार, प्रथिने, लोह असे अन्न पदार्थ आपण सेवन केलेल्या अन्नतूनच शरीराला मिळत असतात. शरीरास आवश्यक असलेले अन्नपदार्थ प्रमाणा पेक्षा जास्त झाले किंवा गरजे पेक्षा कमी झाले तसेच असे वारंवार झाले तर आपण आजारी पडतो. आता हेच बघा ना आपली कोणी चेष्टा मस्करी केली तर आपण एका विशिष्ट मर्यादे पर्यंत सहन करतो. परंतु ती मस्करी अती झाली, सहन शक्ती पेक्षा जास्त झाली तर आपल्याला लगेचच राग येतो अगदी तसेच शरीराच्या क्षमते पेक्षा कमी अधिक काही झाले तर त्याची लक्षणं शरीरावर लगेच दिसतात.
अभ्यंग
अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावून मसाज करणे. खरतर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रोज अभ्यंग करणे शक्य होत नाही. अश्या वेळी किमान डोक, कान व तळपाय यांना तेल लावून मसाज करावे.
शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् ।
अर्थात डोक, कान व पाय यांच्यावर विशेष लक्ष देणे कारण शरीराचे हे भाग वाताशी संबंधित आहेत. हाच वात तरुण असतानाच नियमित नियंत्रणात ठेवल्यास उतार वयात वाताचा त्रास होणार नाही. म्हणूच अभ्यंग नियमित करावे. (ऋतू नुसार तसेच शारीरिक त्रिदोषा नुसार खोबरेल तेल, तीळ तेल, राई तेल, बदाम तेल, आयुर्वेदिक तेल यांचा वापर केल्यास अधिक फायदेशीर.)
पादाभ्यंग
खरत्वं स्तब्धता रौक्ष्यं श्रमः सुप्तिश्च पाद्योः । सद्य एवोपशाम्यन्ति पादाभ्यङ्गनिशेवणात् ॥
जायते सौकुमार्यंच बलं स्थैर्यं च पादयोः । दृष्टि: प्रसादं लाभते मारुतश्चोपशाम्यति ॥
न च स्याद्गृध्रसीवात: पाद्योः स्फुटनं न च । न सिरास्नायुसङ्कोचः पादाभ्यंङ्गेन पादयो: ॥
तळपायांना भेगा पडणे, चिरा जाणे, पाय रुक्ष होणे तसेच श्रम केल्यामुळे पाय सुन्न होणे दुखणे या प्रकारचे आजार पादाभ्यंग मुले बरे होतात. पाय नितळ, सुबक होऊन पायात बळ येते. पायातील नसा बळकट व अधिक कार्यक्षम होतात. डोळ्या संबंधी सर्व आजार तसेच शरीरातील त्रिदोषांचे संतुलन साधण्यासाठी उपयुक्त. व्हेरिकोज व्हेन्स, पायाच्या नसा आखडणे अश्या आजारांवर पादाभ्यंग करणे हा उत्तम उपाय आहे.
आयुर्वेदात उल्लेख केल्या प्रमाणे वरील फायदे मिळतातच शिवाय आमच्या आरोग्य केंद्रात येऊन नियमित पादाभ्यंग करणाऱ्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब सारख्या आजारात तसेच केस गळती, पायाला भोवरी होते, निद्रानाश अश्या व्याधींवर उपाय करून नियंत्रण साधले आहे. तसेच व्याधी मुक्त झाले आहेत. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे. झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात त्यांनी पादाभ्यंग रात्री (खाली चित्रात दाखवलेल्या मशीनवर) किमान २० मिनिटे केल्यास झोपेची गोळी आठवड्य भराता बंद करवी लागेल. कास्य वाटी हातात घेऊन करणार असल्यास एका पायाला २० मिनिटे या प्रमाणे करावे.
शरीरातील वात संतुलित ठेवण्यासाठी आयुर्वेदाने नित्य नियमित पादाभ्यंग करण्यास सांगितले आहे. पादाभ्यंग केल्याने वर नमूद केलेले फायदे मिळतातच शिवाय रक्ताभिसरण होते. टाचदुखी, पायाच्या तळव्यांची जळजळ यावर उपयुक्त. शरीरातील वात, पिक्त व उष्णता नियंत्रित राहते. डोळ्यांची कार्यक्षमता वाढते. चेहऱ्या वरील डाग व डोळ्या खालचे काळे डाग कमी होतात.
आयुर्वेदाने मसाजच्या सहाय्याने शरीरातील त्रिदोष व उष्णता संतुलित ठेवण्यासाठी पादाभ्यंग व अभ्यंग हे प्रमुख दोन विधी सांगितले आहेत.

Source : Google
पादाभ्यंग म्हणजे तळपायाला तेल लावून कांस्य वाटीने विशिष्ठ पद्धतीने मसाज करणे. आधुनिक काळात हातात कांस्य वाटी घेऊन हाताने मासाज करणे फारच त्रासदायक व कंटाळवाणी प्रक्रिया वाटते. म्हणून त्यावर उपाय म्हणून विद्द्युत मोटार वर चालणारी यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. त्या यंत्रावर वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे पाय ठेऊन मसाज करणे सोपे जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक दगदग खूप होते त्यात पायावर ताण येणारे प्रवास करावे लागतात. तर कोणाला दिवसभर उभ राहून काम कराव लागत. शरीर पार थकून जात. या सर्वांवर मात करून आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पादाभ्यंग रोज करणे फायदेशीर ठरते.
आपल्या शरीरातील सर्व अवयवांच्या रक्तवाहिन्या तळहात व तळपाया पर्यंत पोचलेल्या असतात. म्हणूनच तळहात व तळपायाला मसाज केल्याने संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो. सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे रक्ताभिसरण चांगले होते.
या संदर्भातील व्हिडिओ लिंक खाली दिली आहे.
आपल्या शरीरातील सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे आपले तळपाय. म्हणूनच रोज तळपायाला मसाज करणे आवश्यक आहे. म्हणूनच तळपाय स्वस्थ तर आरोग्य मस्त हे आमचे घोषवाक्य आहे.
अभ्यंग स्नान
अभ्यंग स्नान म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावून विशिष्ठ पद्धतीने मसाज करन स्नान करणे.
मसाज करताना हलका ते मध्यम प्रमाणात किंवा झेपेल तेव्हडाच दाब देऊन मसाज केल्यास जास्त फायदेशीर ठरते. शारीरिक दोषा नुसार तसेच ऋतुमाना नुसार तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरते. तेलाचा वापर करताना सर्वसाधारणपणे तिळ तेल, खोबरेल तेल, बदाम तेल किंवा बाजारात उपलब्ध असलेली आयुर्वेदिक तयार तेलांचा वापर फायदेशीर ठरतो. त्या नंतर उटणे लावून अंग चोळावे. उटण्या मधील महत्वाचे घटक चंदन, वाळा, नागरमोथा, सारिवा, मंजिष्ठा, मुलतानी माती, हळद,गोमय चूर्ण इ. घटक वापरतात. केसांसाठी शिकेकाई, रिठा, जटामावसी, जासवंद, लिंबू, आवळा इ. घटक वापरतात.
या संदर्भातील व्हिडिओ लिंक खाली दिली आहे.
आधुनिक काळात अभ्यंग स्नान बहुतेक कुटुंबात फक्त दिवाळी पुरते मर्यादित राहिले आहे. त्यातही बहुतेक कुटुंबातील स्त्रियांना दिवाळीत अभ्यंग स्नानाचा लाभ घेता येत नाही. अभ्यंग स्नान प्रत्येक स्त्री – पुरुषांनी नियमित केल्यास त्याचे शारीरिक फायदे अल्प काळातच अनुभवास येतात.
भारतीय शास्त्रोक्त मसाज करण्याचे फायदे खूप आहेतच शिवाय अबालवृद्धांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक उपचार पद्धती आहे.
म्हणून महिन्यातून किमान एकदातरी अभ्यंगस्नान करावे दार आठवड्यात केल्यास आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. ते ही शक्य होत नसल्यास अभ्यंग रोज करावे. ते ही शक्य होत नसल्यास किमान पादाभ्यंग रोज करावे.
मसाज करण्याचे फायदे
~ रक्ताभिसरण चांगले होते
~ त्वचा तुकतुकीत होते
~ स्नायू बळकट होतात
~ उत्साह वाढतो
~ शरीराची कार्य क्षमता सुधारते
~ थकवा जातो
~ झोप शांत लागते
~ त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत
~ आयुर्मान सुधारते
~ वात संतुलित होतो
~ शरीरातील विषद्रव्य त्वचेतून बाहेर पडतात
जसं मसाज हे एक शास्त्र आहे; तसेच मसाज करणं ही एक कला आहे. आधुनिक काळात ही कला शिकण्यासाठी विविध संस्था उपलब्ध आहेत. आजच्या काळात बरेच निष्णात मसाज करणारे महिला व पुरुष या क्षेत्रात चांगले योगदान देत आहेत.
मसाज कला आपणास शिकायची असल्यास आम्हाला संपर्क करा.
संपर्क : ९८२०६१८९०६
ईमेल : de*************@***il.com
वरील लेख सर्वसाधारण माहिती म्हणून प्रस्तुत केला आहे. वर दिलेल्या माहितीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू.
आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद.
