भारतीय शास्त्रोक्त मसाज करण्याचे फायदे

Benefits of Indian Scientific Massage

https://product.aarogyasakha.com/e-book
 

आयुर्वेदाने दिलेल्या मानवी जीवन पध्दती मधील मसाज हा एक महत्वाचा घटक आहे. हजारो वर्षा पूर्वी मसाज करण्याचे लाभ त्या काळातील ऋषींनी समाजाला ज्ञात करून दिले व त्याची माहिती आयुर्वेदातील सर्व संहितां मध्ये उपलब्ध आहे. 

 मसाज म्हणजे काय ? 

अंगाला तेल लावून विशिष्ठ पद्धतीने घर्षण व दाब देऊन शरीराला आराम देण्याच्या पद्धतीला मसाज असे म्हणतात.  

Image Source – Google

मसाज करण्याचे फायदे  

~   त्वचा तुकतुकीत होते 

~   स्नायू बळकट होतात 

~  थकवा जातो 

~   झोप शांत लागते 

~   रक्ताभिसरण चांगले होते 

~  वात संतुलित होतो 

~   त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत 

~   आयुर्मान सुधारते  

मसाज उपचार म्हणून कधी करावा  

अंगदुखी, मान, पाठ व कंबरेत उसण भरली असल्यास, सायटिका, व्हेरिकोज व्हेन्स, लकवा या साठी मसाज उपचार फायदेशीर आहे. 

मसाज कोणी करावा  

नवजात शिशू पासून वृद्ध व्यक्तीं पर्यंत सर्व  स्री -पुरुषांनी करावा 

मसाज कधी करू नये  

◉   जखम झालेल्या जागी करू नये  

◉   अस्थिभंग (फ्रॅक्चर) झाला असेल त्या जागी करू नये

◉   शल्य चिकित्सा (ऑपरेशन झालेल्या जागी ३ ते ६ महिने) करू नये 

◉   जेवण झाल्यावर करू नये

◉   गर्भवती स्री ला छाती पासून ओटीपोटा पर्यंत करू नये  (आवश्यक असल्यास तज्ञानचा सल्ला घेणे)

◉   स्त्रियांनी मासिक धर्म काळात पोटाला करू नये 

◉   ताप आलेला असल्यास करू नये 

◉   डीप व्हेन थ्रोम्बोसिस किंवा हत्ती पाय आजार झालेल्या व्यक्तींनी पायाला मसाज करू नये.  

 

आयुर्वेदा नुसार प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वात, पित्त व कफ या त्रिदोषांनीं युक्त असते. या त्रिदोषांचे संतुलन बिघडल्यास निरनिराळ्या शारीरिक व्याधी सुरु होतात. तसेच शरीरातील अतिरिक्त उष्णतेमुळे सुद्धा विविध व्याधी उद्भवतात. म्हणून रोज मसाज करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. खरतर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रोज अभ्यंग करणे शक्य होत नाही. अश्या वेळी किमान डोक, कान व तळपाय यांना तेल लावून मसाज करावे. ते हि शक्य होत नसल्यास पादाभ्यंग करावे.  


शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् ।

अर्थात डोक, कान व पाय यांच्यावर विशेष लक्ष देणे कारण शरीराचे हे भाग वाताशी संबंधित आहेत. शरीरातील वात संतुलित ठेवण्यासाठी आयुर्वेदाने नित्य नियमित पादाभ्यंग करण्यास सांगितले आहे. पादाभ्यंग केल्याने वर नमूद केलेले फायदे मिळतातच शिवाय टाचदुखी, पायाच्या तळव्यांची जळजळ व भेगा कमी करण्यासाठी तसेच व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त. शरीरातील वात, पिक्त व उष्णता नियंत्रित राहते. डोळ्यांची कार्यक्षमता वाढते. चेहऱ्या वरील डाग व डोळ्या खालचे काळे डाग कमी होतात.  

आयुर्वेदाने मसाजच्या सहाय्याने शरीरातील त्रिदोष व उष्णता संतुलित ठेवण्यासाठी पादाभ्यंग व अभ्यंग हे प्रमुख दोन विधी सांगितले आहेत. 

पादाभ्यंग 

Image Source – Google

 

पादाभ्यंग म्हणजे तळपायाला तेल लावून कांस्य वाटीने विशिष्ठ पद्धतीने मसाज करणे. आधुनिक काळात हातात कांस्य वाटी घेऊन हाताने मासाज करणे फारच त्रासदायक व कंटाळवाणी प्रक्रिया वाटते. म्हणून त्यावर उपाय म्हणून विद्द्युत मोटार वर चालणारी यंत्र बाजारात उपलभद्ध आहेत. त्या यंत्रावर वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे पाय ठेऊन मसाज करणे सोपे जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक दगदग खूप होते त्यात पायावर ताण येणारे प्रवास असतात तर कोणाला  दिवसभर उभ राहून काम कराव लागत. शरीर पार थकून जात. या सर्वांवर मात करून आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पादाभ्यंग रोज करणे फायदेशीर ठरते.  

आपल्या शरीरातील सर्व अवयवांच्या रक्तवाहिन्या तळपाया पर्यंत पोचलेल्या असतात. म्हणूनच तळपायाला मसाज केल्याने संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो. 

आपल्या शरीरातील सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे आपले तळपाय. म्हणूनच रोज तळपायाला मसाज करणे आवश्यक आहे.  

तळपाय स्वस्थ तर आरोग्य मस्त

Image Source – Google

अभ्यंग 

अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावून विशिष्ठ पद्धतीने मसाज करणे. 

मसाज करताना हलका ते मध्यम प्रमाणात किंवा झेपेल तेव्हडाच दाब देऊन मसाज केल्यास जास्त फायदेशीर ठरते. शारीरिक दोषा नुसार तसेच ऋतुमाना नुसार तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरते. तेलाचा वापर करताना सर्वसाधारणपणे तिळ तेल, खोबरेल तेल, बदाम तेल किंवा बाजारात उपलब्ध असलेली आयुर्वेदिक तयार तेलांचा वापर फायदेशीर ठरतो.  

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.   

 

0 0 votes
Article Rating
4 Comments
Oldest
Newest Most Voted
SUSHANT VILAS GAIKWAD
SUSHANT VILAS GAIKWAD
5 years ago

INFORMATIVE ARTICLE.

Anonymous
Anonymous
5 years ago

Very informative… Many times Best option for surgery… Pain relief treatment

Anonymous
Anonymous
3 years ago

Informative 👌👌👌